Ladki Bahin Yojana Fund Cut: लाडक्या बहिणींच्या निधीत कपात तर शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, राज्यात कोणत्याही नवीन योजना नाहीत

3 Min Read
Maharashtra Budget 2025 Ladki Bahin Yojana Fund Cut Maharashtra Debt (Photo Credit: PTI Photo)

Maharashtra Budget 2025 Ladki Bahin Yojana Fund Cut Maharashtra Debt: महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीनंतरचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) सादर केला असून, राज्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम करणारे आकडे समोर आले आहेत. राज्यावर ₹9.3 लाख कोटींचे विक्रमी कर्ज (Maharashtra Debt 2025) असून, 2025-26 साठी महसुली तूट (Revenue Deficit) ₹45,891 कोटींवर पोहोचली आहे.

लाडक्या बहिणींच्या निधीत कपात (Fund Cut in Ladki Bahin Yojana)

महिला सशक्तीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेसाठीच्या निधीत सरकारने मोठी कपात केली आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांना दरमहा ₹2,100 देण्याचे आश्वासन (₹2,100 Per Month for Women) दिले होते. मात्र, वाढत्या आर्थिक तुटीमुळे लाडकी बहीण योजनेसाठीचा निधी ₹10,000 कोटींनी कमी करण्यात आला आहे. 2025-26 साठी लाडकी बहीण योजनेसाठी ₹36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट दर्शवते.

🔴 हेही वाचा 👉 विधानसभा निवडणुकीनंतर १४ लाख नव्या लाभार्थ्यांची नोंदणी – मंत्री अदिती तटकरे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, कोणत्याही नवीन योजना नाहीत (No Farm Loan Waiver, No New Schemes)

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 (Maharashtra Budget 2025) मध्ये कोणतीही नवीन मोठी योजना नाही, सरकारने विद्यमान योजनांना चालू ठेवण्यावर भर दिला आहे.

राजकोषीय तूट GSDP च्या 2.76% वर ठेवण्यात आली असून, ती निर्धारित मर्यादेत असल्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी सांगितले.

🔴 हेही वाचा 👉 मार्च महिन्याचा हप्ता जमा, तुमच्या खात्यात जमा झाले का पैसे?.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानीय विकासासाठी वाढीव निधी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेसाठी 11% वाढ करण्यात आली असून, निधी ₹18,165 कोटींवरून ₹20,165 कोटींवर नेण्यात आला आहे.

अनुसूचित जाती साठी 42% आणि अनुसूचित जमाती साठी 40% वाढ करण्यात आली आहे.

नवीन कर आणि महसूल वाढ

मोटार वाहन करासह नवीन कर लागू करण्यात येणार असून, यामुळे ₹1,125 कोटींचा अतिरिक्त महसूल अपेक्षित आहे.

शासनाने स्टँप ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अधिक महसूल मिळेल.

महाराष्ट्र राज्याच्या कर्जात मोठी वाढ (Maharashtra Debt 2025 Reaches Record High)

महाराष्ट्र सरकारचे सध्याचे कर्ज ₹9.3 लाख कोटींवर पोहोचले आहे, जे 2024-25 मधील ₹7.1 लाख कोटींहून ₹2 लाख कोटींनी अधिक आहे.

गेल्या 10 वर्षांत हे कर्ज तिप्पट झाले आहे.

🔴 हेही वाचा 👉 अर्थसंकल्प आणि लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत अजित पवारांनी दिली माहिती.

Share This Article