Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’ना 2100 रूपये देणार का नाही? अजित पवार – अदिती तटकरे यांची परस्परविरोधी माहिती?

3 Min Read
Ladki Bahin Yojana 2100 Rupees Latest Update Aditi Tatkare

Ladki Bahin Yojana Latest News: महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता सरकारकडून स्पष्ट उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी यावर स्पष्टीकरण देताना सर्व आकडेवारी स्पष्ट केली आहे, पण त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.

सरकारकडून 2100 रुपये मिळणार की नाही?

विरोधकांनी विचारलेल्या “लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देणार का नाही?” या प्रश्नावर अदिती तटकरे यांनी थेट उत्तर न देता “मुख्य निर्णय वरिष्ठ नेते घेतील” असे उत्तर दिले. यापूर्वीही त्यांनी सांगितले होते की, “जाहीरनामा हा 5 वर्षांसाठी असतो.” त्यामुळे 2100 रुपये लगेच मिळतील का, यावर सरकारची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

बजेटमधील आकडेवारी आणि विरोधकांचा सवाल

  • सरकारने सुरुवातीला सांगितले होते की, ‘लाडकी बहीण योजने’साठी वार्षिक 47,000 कोटी रुपये लागतील.
  • मात्र, 2025 च्या अर्थसंकल्पात सरकारने फक्त 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  
  • याचा अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत 10,000 कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे.  
  • फेब्रुवारी 2024 मध्ये 2 कोटी 47 लाख महिलांना लाभ दिला गेला.
  • 2025 साठी ही संख्या 2 कोटी 53 लाख झाली असली तरी, निधी मात्र कमी केला गेला आहे. 

🔴 हेही वाचा 👉 महिला सशक्तीकरणासाठीच्या योजनांबाबत सरकारची भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण.

अजित पवार – अदिती तटकरे यांची परस्परविरोधी माहिती?

  • आदिती तटकरे म्हणतात की, “निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींची संख्या वाढली.”  
  • पण अजित पवार यांनी अर्थसंकल्पात त्यांच्यासाठीची तरतूद मात्र 10,000 कोटींनी कमी केली.  
  • त्यामुळे “संख्या वाढली पण निधी कमी झाला, मग 2100 रुपये कसे देणार?” आणि 1500 द्यायलातर निधी पुरेल का? असा सवाल विरोधकांनी केला आहे. 

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना बंद केली, तर इतर महत्त्वाच्या योजना सुरू करता येतील.

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

विरोधकांनी सरकारला लक्ष्य करत म्हटले की, “महिला मतदारांना आश्वासन देऊन आता सरकार हात झटकत आहे. 1500 रुपये वाढवून 2100 रुपये देण्याची घोषणा निवडणुकीपूर्वी केली, पण प्रत्यक्षात निधीच कमी केल्याने महिलांची फसवणूक झाली आहे.”

महिला लाभार्थींमध्ये आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने आश्वासन पूर्ण करावे किंवा भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे. प्रत्यक्षात 2100 रुपये मिळतील का? हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींच्या निधीत कपात तर शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, राज्यात कोणत्याही नवीन योजना नाहीत.

Share This Article