Majhi Ladki Bahin Yojana 9th Installment: सर्व महिलांच्या खात्यात आज जमा होणार मार्च महिन्याचा हफ्ता

2 Min Read
Maharashtra Ladki Bahin Yojana March 1500 Installment Update

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जाते. याआधी सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र जमा करण्याचे आश्वासन दिले होते.

होळीपूर्वी जमा होणार मार्च महिन्याचा हप्ता

फेब्रुवारी महिन्याचा ₹1500 चा हप्ता 7 मार्च 2025 रोजी महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. मात्र, मार्च महिन्याचा हप्ता अद्याप सर्व लाभार्थ्यांना मिळालेला नाही, यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

अधिकृत सूत्रांनुसार, 13 मार्च 2025 पासून मार्च हप्त्याच्या ट्रान्सफर प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. अनेक लाभार्थींना त्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) द्वारे ₹1500 जमा झाल्याचा SMS मिळत आहे. त्यामुळे होळीपूर्वीच सर्व पात्र महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

योजनेच्या निधीत कपात, ₹2100 हप्ता कधी?

महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान हफ्त्याची रक्कम ₹2100 करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी फक्त ₹36,000 कोटींची तरतूद केली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत ₹10,000 कोटींनी कमी आहे. विरोधकांनी यावरून सरकारवर टीका केली असून, निधी कपातीमुळे महिलांच्या भविष्यात जमा होणाऱ्या पुढच्या हफ्त्यांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkar) यांनी स्पष्ट केले आहे की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि भविष्यात अधिक निधीची गरज भासल्यास पुढील अधिवेशनात त्याची तरतूद केली जाईल. तसेच, 2100 रुपयांचा हप्ता लागू करण्यासंबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील.

माझी लाडकी बहिण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात मार्च महिन्याचा हप्ता होळीपूर्वी जमा केला जाणार आहे. मात्र, हफ्त्याची रक्कम वाढवून 2100 करण्याचा निर्णय राज्य सरकारने अद्याप घेतलेला नाही. पुढील काही महिन्यांत या संदर्भात स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 ‘लाडक्या बहिणीं’ना 2100 रूपये देणार का नाही? अजित पवार – अदिती तटकरे यांची परस्परविरोधी माहिती?.

Share This Article