Ladki Bahin Yojana Will Close Sanjay Raut Claims : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना आणली गेली. तसेच या योजनेमुळे अनेक गोरगरीबांच्या योजना बंद झाल्या असून सरकार आता कर्जबाजारी झाले आहे. त्यामुळे लवकरच माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बंद होणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकार कर्जबाजारी? संजय राऊतांचा आरोप
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार प्रहार केला. त्यांच्या मते, महाराष्ट्र सरकार सध्या ९ लाख ३२ हजार कोटी रुपयांच्या कर्जाखाली आहे. अशा परिस्थितीत सरकारने कर्ज काढून लाडकी बहीण योजना सुरू केली, जी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे.
गोरगरीबांसाठीच्या योजना बंद?
राऊत यांच्या म्हणण्यानुसार, शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा यासारख्या इतर गोरगरीबांसाठीच्या अनेक कल्याणकारी योजना बंद करण्यात आल्या आहेत. आता हळूहळू लाडकी बहीण योजना देखील बंद केली जाईल, असा त्यांचा दावा आहे.
🔴 हेही वाचा 👉 मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरूवात, फेब्रुवारी-मार्च महिन्याचे पैसे न मिळण्यामागचे कारण काय?.
महिलांच्या मतांसाठी योजना सुरू?
संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले की, “निवडणुकीच्या काळात महिलांची मते विकत घेण्यासाठी राज्याच्या तिजोरीतील पैश्यांचा वापर करण्यात आला.”
महायुतीच्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेसाठी २१०० रुपये आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी यासारख्या घोषणा आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकार राज्यावर वाढलेल्या कर्जाचा भार कसा कमी करणार? महिलांना दिलेल्या आश्वासनानुसार २१०० रुपये कुठून आणून देणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणीं’ना 2100 रूपये देणार का नाही? अजित पवार – अदिती तटकरे यांची परस्परविरोधी माहिती?.
महायुती सरकारवर सडकून टीका
संजय राऊत यांनी नुकत्याच सादर झालेल्या राज्य अर्थसंकल्पावर (Maharashtra Budget 2025-26) सडकून टीका केली. सरकारच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, लाडकी बहीण योजना लवकरच बंद होईल, अस संजय राऊत म्हणाले.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींची संख्या वाढली! या महिलांना 500 रुपयांची वाढ, अदिती तटकरेंचे विधानसभेत स्पष्टीकरण.