Majhi Ladki Bahin Yojana 2025 Update : महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये माझी लाडकी बहिण योजना सुरू करून महिलांसाठी दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र निवडणुकीपूर्वी सरकारने या 1500 रुपयांच्या रकमेत वाढ करून 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. आता सरकारने या योजनेबाबत मोठे स्पष्टीकरण दिले आहे.
माझी लाडकी बहिण योजनेचे 2100 रुपये केव्हा मिळणार?
सध्या महाराष्ट्रात महायुती सरकार कार्यरत असून, त्यांनी निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्यात 600 रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, 2025 च्या अर्थसंकल्पात (Budget 2025) या वाढीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. उलट योजनेसाठीचा निधी कमी करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पात 2100 रुपयांचा उल्लेख नाही
महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात माझी लाडकी बहिण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अतिरिक्त निधी मंजूर केलेला नाही. त्यामुळे सध्या महिलांना 2100 रुपयांची मदत देणे शक्य नाही.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणीं’ना 2100 रूपये देणार का नाही? अजित पवार – अदिती तटकरे यांची परस्परविरोधी माहिती?.
मुख्यमंत्र्यांच वक्तव्य – सरकारच मत काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, राज्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या निधीत वाढ केली जाईल. सरकारच्या म्हणण्यानुसार, राजकोषीय संतुलन प्रस्थापित झाल्यानंतर वाढ लागू करण्यात येईल.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींची संख्या वाढली! या महिलांना 500 रुपयांची वाढ, अदिती तटकरेंचे विधानसभेत स्पष्टीकरण.
महिलांना 2100 रुपये कधी मिळतील?
आत्तापर्यंत सरकारने कोणतीही ठोस तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, अर्थव्यवस्थेच्या स्थितीनुसार, योजना सुधारित स्वरूपात लागू होण्यास आणखी काही महिने लागू शकतात. अस अदिती तटकरे यांनी स्पष्ट केल आहे.
🔴 हेही वाचा 👉 अनेक योजना बंद झाल्या! आता लाडकी बहीण योजना बंद? संजय राऊत यांचा दावा.