Mukhyamantri Bal Ashirwad Yojana Maharashtra: मुख्यमंत्री नावाने बनावट योजना! ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेपासून सावध राहा

2 Min Read
Fake Mukhyamantri Bal Ashirwad Yojana Maharashtra

Fake Mukhyamantri Bal Ashirwad Yojana Maharashtra 2025: महाराष्ट्रात मुख्यमंत्री नावाचा वापर करून बनावट योजनेची अफवा पसरवली जात असल्याचे समोर आले आहे. ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ (Mukhyamantri Bal Ashirwad Yojana) नावाने शासनाची योजना असल्याचा दावा समाजमाध्यमांद्वारे केला जात आहे. मात्र, महिला व बालविकास विभागाने ही योजना अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले आहे आणि नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.

कशी पसरली बनावट योजनेची अफवा?

समाजमाध्यमांवर एका संदेशामध्ये दावा केला जात आहे की, १ मार्च २०२० नंतर ज्यांच्या दोन्ही पालकांचे किंवा एका पालकाचे निधन झाले आहे, अशा १८ वर्षांखालील मुलांना ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या योजनेअंतर्गत दरमहा ४,००० रुपये मिळणार आहेत. तसेच, या योजनेसाठी तहसील कार्यालयात अर्ज उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र, राज्यात अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही आणि हा संदेश केवळ अफवा आहे. या नावाने कोणतीही शासकीय मदत दिली जात नसून नागरिकांनी अशा फसव्या योजनेला बळी पडू नये, असे महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

🔴 हेही वाचा 👉 नवीन अपडेट; लाडकी बहिण योजनेच्या बजेटमध्ये मोठा बदल, लाडक्या बहिणींची निराशा.

अनाथ मुलांसाठी असलेल्या वास्तविक योजना

राज्यात अनाथ किंवा एकल पालक असलेल्या मुलांसाठी विविध शासकीय योजना उपलब्ध आहेत. त्याबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी नागरिकांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

🔴 हेही वाचा 👉 महिला समृद्धी योजना महाराष्ट्र; महाराष्ट्रातील गृहिणींसाठी सरकारी योजना.

महत्वाची सूचना:

✅ समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही योजनेची आधी खात्री करा.  

✅ अधिकृत सरकारी वेबसाईट आणि स्थानिक प्रशासनाकडूनच माहिती मिळवा.  

✅ फसवणुकीपासून सावध राहा आणि कोणतीही कागदपत्रे व अन्य आर्थिक माहिती शेअर करू नका.  

➡️ अशा प्रकारच्या फसव्या योजना आणि शासकीय धोरणांबाबतच्या सत्य माहितीकरिता Sarkari Yojana Marathi ला नियमितपणे भेट द्या! आणि आम्हाला Google News वर फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला ताज्या अपडेट्स तत्काळ मिळतील.

Share This Article