Aadhaar Update: जुना मोबाइल नंबर बंद झाला? अशा प्रकारे आधारशी लिंक करा नवीन नंबर

2 Min Read
Aadhaar Card Mobile Number Update Process

Aadhaar Mobile Number Link: आधार अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Aadhaar Card Mobile Number Update Process : आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर OTP मिळतो, जो अनेक सरकारी आणि खासगी कामांसाठी आवश्यक असतो. मात्र, जर जुना नंबर बंद झाला असेल, तर नवीन नंबर अपडेट करणे गरजेचे आहे. येथे नवीन मोबाइल नंबर आधारशी कसा लिंक करायचा याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया दिली आहे.  

आधार कार्डवर नवीन मोबाइल नंबर कसा अपडेट करावा?

  1. आधार सेवा केंद्राला भेट द्या

✅ तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्रावर जा.    

  1. फॉर्म भरणे

✅ आधार सुधारणा फॉर्म घ्या आणि योग्य माहिती भरा.  

✅ आपले नाव, आधार नंबर आणि नवीन मोबाइल नंबर टाका.  

✅ फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक असावी.

🔴 हेही वाचा 👉 ‘लाडकी बहिण योजना’ महाराष्ट्र सरकारसाठी मोठ आर्थिक संकट, मंत्री म्हणाले – मागण्या कमी करा.

  1. बायोमेट्रिक प्रक्रिया

✅ तुमचा फोटो आणि फिंगरप्रिंट स्कॅन केली जाईल.  

✅ त्यानंतर तुमची माहिती सिस्टममध्ये अपडेट केली जाईल.  

  1. नवीन मोबाइल नंबरची नोंदणी

✅ प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एक रिसीप्ट (स्लिप) मिळेल, त्यावर रिक्वेस्ट नंबर असेल.  

✅ 2-3 दिवसांनंतर, नवीन नंबर आधारशी लिंक झालाय का, ते UIDAI च्या वेबसाइटवरून तपासा. 

🔴 हेही वाचा 👉 बचत गुंतवणुकीसाठी सरकारची 100% हमी असलेली योजना.

Share This Article