Aadhar Update: आधार कार्डमध्ये कोणती माहिती किती वेळा अपडेट करता येते? संपूर्ण माहिती जाणून घ्या

2 Min Read
Aadhar Card Update Name Dob Gender Address

Aadhar Card Update Name Dob Gender Address : आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे, जे विविध शासकीय आणि खासगी सेवांसाठी अत्यावश्यक आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) नागरिकांना त्यांच्या आधारवरील माहिती अपडेट करण्याची सुविधा देते, मात्र त्यासाठी काही मर्यादा घालून दिल्या आहेत. प्रत्येक माहिती वारंवार बदलता येत नाही आणि काही अपडेट्ससाठी ठरावीक अटी लागू होतात. त्यामुळे, आधार कार्डमध्ये कोणती माहिती किती वेळा अपडेट करता येते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

नावामध्ये बदल किती वेळा करता येतो?

आधार कार्डवरील नाव केवळ दोन वेळा बदलण्यास परवानगी आहे. हा बदल चुकीच्या नावाच्या दुरुस्तीसाठी किंवा विवाहानंतर आडनाव बदलण्यासाठी करता येतो. मात्र, नाव दोन वेळा बदलल्यानंतर पुन्हा नाव दुरुस्त करता येणार नाही.

आधार कार्डमध्ये लिंग बदल किती वेळा करता येईल?

आधार कार्डमध्ये लिंग बदलाची सुविधा केवळ एकदाच उपलब्ध आहे. जर लिंग अपडेट करताना कोणतीही चूक झाली, तर नंतर त्यात सुधारणा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे माहिती योग्यप्रकारे भरावी.

पत्ता किती वेळा बदलता येतो?

नाव आणि लिंग बदलण्याच्या मर्यादेपेक्षा पत्ता बदलण्याची सुविधा जास्त लवचिक आहे. आधार कार्डमध्ये पत्ता कितीही वेळा अपडेट करता येतो. स्थलांतर करणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे. पत्ता बदलण्यासाठी पाण्याच बिल, वीजबिल, भाडे करार यांसारख्या अधिकृत कागदपत्रांचा आधार घेतला जातो.

जन्मतारीख बदलण्याची मर्यादा किती आहे?

आधार कार्डवरील जन्मतारीख फक्त एकदाच अपडेट करता येते. त्यामुळे, ही माहिती बदलण्याआधी योग्य विचार करावा.

UIDAI ने आधार कार्ड अपडेट प्रक्रियेसाठी काही निश्चित मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कोणतेही बदल करायचे असतील, तर UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.

🔴 हेही वाचा 👉 Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2025: 5 लाखांपर्यंतचे अनुदान उपलब्ध.

Share This Article