Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : राज्याच्या तिजोरीवर लाडकी बहीण योजनेचा मोठा आर्थिक भार पडत असला तरी, लाडकी बहीण योजनेबाबत आधीच खर सांगितलं असत, तर आमच सरकार आल नसत, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
लाडकी बहीण योजनेचा राज्याच्या तिजोरीवर भार
लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडतोय, यावर विविध स्तरातून टीका केली जात आहे. यापूर्वी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे.
अजित पवारांनी नेमक काय सांगितल?
महायुती सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करण्याचा सर्वाधिक अनुभव असलेल्या अजित पवार यांना मुलाखतीत विचारण्यात आल की, लाडकी बहीण योजना लागू करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहीण योजनेचा आर्थिक ताण सांगितला होता का?
यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले,
“मी जर त्यावेळी खर सांगितल असत, तर आम्ही परत आलोच नसतो! सरकार कस येईल, हे बघण महत्त्वाच असत.”
“आम्ही काही साधू-संत नाही!”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही काही साधू-संत नाही. आमचही काही व्हिजन आहे. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. केंद्रात आमच सरकार आहे, त्यांची मदत घेऊन राज्याच उत्पन्न वाढवून आर्थिक प्रश्न सोडवू.” आणि लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देऊ.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचा बदल, सरकारचा नवा प्रस्ताव.
सरकारी योजनांबाबत महत्त्वाच स्पष्टीकरण
अजित पवारांनी असही स्पष्ट केल की, “आम्ही कोणतीही योजना बंद करणार नाही. जर केंद्र आणि राज्य सरकारची योजना सारखीच असेल, तर राज्यातील योजना बंद करून केंद्राच्या योजनेचा लाभ घेऊ. जसे केंद्र सरकारच्या बिनव्याजी कर्ज योजनेचा आम्ही लाभ घेत आहोत.”
🔴 हेही वाचा 👉 एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही – एकनाथ शिंदे यांची ग्वाही.