Ayushman Bharat Yojana: आयुष्मान कार्ड हरवले किंवा चोरी झाले तर मोफत उपचार मिळणार की नाही? जाणून घ्या नियम

2 Min Read
Ayushman Bharat Yojana Lost Card Treatment Process

Ayushman Bharat Yojana Lost Card Treatment Process : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना मोफत आरोग्यसेवा दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड (Ayushman Card) दिले जाते, ज्याद्वारे ते सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात.

परंतु, जर आयुष्मान कार्ड हरवले किंवा चोरी झाले, तर मोफत उपचाराचा लाभ घेता येईल का? यासाठी काय प्रक्रिया आहे आणि कोणते नियम लागू होतात, हे जाणून घेऊयात…  

आयुष्मान कार्ड हरवले तरी मोफत उपचार शक्य

जर तुमचे आयुष्मान कार्ड हरवले किंवा चोरीला गेले, तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्यासाठी सुचिबद्ध रुग्णालयातील मित्र हेल्पडेस्क येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या आयुष्मान कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर द्यावा लागेल. त्यांच्याकडून तुमची माहिती तपासली जाईल आणि सत्यापन झाल्यानंतर तुम्हाला मोफत उपचाराची परवानगी दिली जाईल.

आयुष्मान कार्ड कसे बनवले जाते?

आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी पात्र नागरिकांना नजीकच्या CSC केंद्रावर (कॉमन सर्व्हिस सेंटर) जावे लागते.  

  • अधिकृत व्यक्ती अर्जदाराची पात्रता पडताळून पाहते.  
  • आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाते.  
  • सर्व तपशील योग्य आढळल्यास अर्ज स्वीकारला जातो.  
  • त्यानंतर काही दिवसांत आयुष्मान कार्ड बनते, जे डाउनलोड करून मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेता येतो.

🔴 हेही वाचा 👉 बांधकाम कामगारांसाठी सरकारचा मोठा निर्णय, दरवर्षी मिळणार 12 हजार रुपये.

या योजनेचे प्रमुख फायदे

  • दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य कव्हर  
  • संपूर्ण खर्च सरकारकडून करण्यात येतो
  • देशभरातील सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये उपचार उपलब्ध
  • ऑपरेशन, औषधे आणि रुग्णालयात भरतीसाठी कव्हर  

जर तुमचे आयुष्मान कार्ड हरवले किंवा चोरी झाले, तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. यासाठी आयुष्मान कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर मित्र हेल्पडेस्कवर देऊन सत्यापन पूर्ण करावे लागेल. त्यामुळे कार्ड हरवले तरी घाबरण्याची गरज नाही. योग्य प्रक्रिया अवलंबून तुम्ही सहजपणे मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकता.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना सरकारकडून 5 लाख रुपयांचे व्याजमुक्त कर्ज.

Share This Article