Ayushman Bharat Yojana Eligibility Check : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार मिळतात. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे. तुम्हीही आयुष्मान भारत कार्ड बनवू इच्छित असाल, तर खालील सोप्या पद्धतीने जाणून घ्या तुम्ही आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र आहात का.
Contents
आयुष्मान भारत योजनेसाठी तुमची पात्रता कशी तपासाल?
स्टेप 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- सर्वप्रथम आयुष्मान भारत योजना अधिकृत वेबसाइट वर जा.
- येथे ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 2: मोबाईल नंबर नोंदणी
- आता तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ‘ओटीपी’ (OTP) मागवा.
- मिळालेला ओटीपी भरून लॉगिन करा.
स्टेप 3: राज्य आणि जिल्हा निवडा
- लॉगिन केल्यानंतर तुमच्या राज्याचे आणि जिल्ह्याचे नाव निवडा.
- त्यानंतर आधार क्रमांक किंवा इतर ओळखपत्र प्रविष्ट करा आणि सर्च करा.
- जर तुम्ही पात्र असाल, तर तुम्ही आयुष्मान कार्ड बनवून घेऊ शकता.
आयुष्मान कार्ड कुठे आणि कसे बनवावे?
जर तुम्ही पात्र असाल, तर तुमच्या नजीकच्या CSC (Common Service Center) केंद्रावर जा.
- तेथे तुमची कागदपत्रे तपासतील आणि अर्ज प्रक्रिया सुरू होईल.
- काही दिवसांत तुम्ही तुमचे आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.
🔴 हेही वाचा 👉 बोअरवेल खोदण्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत अनुदान, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.