Bandhkam Kamgar Pension Yojana: बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपयांची पेन्शन, महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

2 Min Read
Bandhkam Kamgar Yojana Maharashtra Labor Pension Scheme

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra Labor Pension Scheme : महाराष्ट्र सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या नव्या योजनेनुसार, 60 वर्षे पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे. राज्याचे श्रम मंत्री आकाश फुंडकर यांनी ही माहिती विधानसभेत दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या योजनेस सैद्धांतिक मंजुरी दिली आहे.

बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी सरकारचा मोठा निर्णय

Bandhkam Kamgar Pension Yojana : राज्यातील श्रमिक कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने सरकारने विविध डिजिटल पोर्टल्सचे उद्घाटन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळाच्या (MBOCW) उपकर पोर्टलसह विविध डिजिटल प्रणालींचे अनावरण करण्यात आले.

श्रम विभागाने बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना प्रस्तावित केली असून लवकरच तिचे विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे (SOP) तयार केली जाणार आहेत. याशिवाय, राज्य सरकारने माथाडी कायदा आणि खाजगी सुरक्षा रक्षक कायद्यातही सुधारणा केली आहे.

🔴 हेही वाचा 👉 शासन निर्णय जारी, लवकरच खात्यावर जमा होणार अनुदान.

नव्या डिजिटल प्रणालीमुळे राज्यभरात उपकर संकलन प्रक्रियेत सुधारणा होईल आणि त्यामुळे नोंदणीकृत श्रमिकांना अधिक लाभ मिळू शकतील. तसेच, नवीन बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सिस्टम (BMMS) आणि डिजीलॉकर सुविधेमुळे श्रमिक कल्याण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली ही पेन्शन योजना (Bandhkam Kamgar Pension Yojana) आणि डिजिटल सुधारणांमुळे महाराष्ट्रातील लाखो कामगारांना आर्थिक स्थैर्य आणि अधिक सोयीसुविधा मिळण्याची शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 ‘जिवंत सातबारा’ मोहीम, वारसांना जमिनीच्या हक्काची त्वरित नोंदणी मिळणार.

Share This Article