जागा खरेदीसाठी मिळणार 1 लाख रुपयांचे अनुदान Maharashtra Land Purchase Grant Apply

2 Min Read
Bandhkam Kamgar Yojana Maharashtra Land Purchase Grant Apply

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra Land Purchase Grant Apply : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता बांधकाम कामगारांना स्वतःची जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. याआधी ही रक्कम 50 हजार रुपये होती, मात्र आता ती दुप्पट करण्यात आली आहे. बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या या निर्णयामुळे हजारो कामगारांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे.

🔥 हेही वाचा 👉 शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन, असा करा अर्ज.

लाभार्थ्यांसाठी आवश्यक अटी आणि पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराने बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागातील नोंदणीकृत कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत 1.50 लाख रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे, त्यामुळे एकूण मिळणारी आर्थिक मदत 2.50 लाख रुपये इतकी असेल.  

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करताना आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड आणि सरकारी कंत्राटदार किंवा ग्रामसेवक यांची सही आणि शिक्का असलेले 90 दिवसांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अशी करा घरबसल्या नोंदणी

  1. बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाइट

 https://mahabocw.in/ वर जा.  

  1. ‘Construction Worker: Registration’ वर क्लिक करा.  
  2. आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून ‘Proceed to Form’ वर क्लिक करा.  
  3. 1 रुपया ऑनलाईन पेमेंट करून अर्ज सक्रीय करा.  

नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच कामगारांना बांधकाम कामगारांसाठीच्या 32 सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. त्यामुळे जागा खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कामगारांनी ही संधी सोडू नये.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना ५०,०००, स्वतंत्र्य बचत गट तयार केल्यास १० लाख रुपयांपर्यंतची भांडवल.

Share This Article