Borewell Yojana Maharashtra 2025 : बोअरवेल खोदण्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत अनुदान, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

3 Min Read
Borewell Yojana Maharashtra Apply Online 2025

Borewell Yojana Maharashtra Apply Online 2025 : महाराष्ट्र शासनाच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने (Birsa Munda Krushi Kranti Yojana Maharashtra) अंतर्गत अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी विविध सुविधा दिल्या जात आहेत. आता या योजनेत बोअरवेल (Borewell) सुविधेलाही समाविष्ट करण्यात आले असून 50,000 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.  

Borewell Yojana Maharashtra योजनेचा उद्देश

राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जाते. योजनेत शेतकऱ्यांना नवीन विहीर, विहिरीतील बोअरिंग, पीव्हीसी पाइप, जुनी विहीर दुरुस्ती आणि शेततळ्यासाठी प्लास्टिक पन्नी यांसाठी 100% अनुदान दिले जाते.

महत्त्वाचे फायदे

  • बोअरवेल खोदण्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत अनुदान.
  • 100% अनुदानावर विहीर, बोअरिंग, शेततळे, सिंचन सुविधा.
  • शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा सुधारण्यास मदत.
  • अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना विशेष लाभ.

Borewell Yojana पात्रता (Eligibility Criteria)

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.  
  • अर्ज करणारा अनुसूचित जमातीतील शेतकरी असावा.  
  • अर्जदाराकडे किमान 0.40 हेक्टर जमीन असावी.  
  • वार्षिक उत्पन्न ₹1.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • शेतजमिनीचा 7/12 उतारा आणि 8-अ नोंद अर्जदाराच्या नावावर असावा.
  • शेतात पूर्वी विहीर नसल्याचा दाखला आवश्यक.

🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दरमहा 1500 रुपये निवृत्तीवेतन देणारी योजना.

आवश्यक कागदपत्रे

✅ आधार कार्ड  

✅ जातीचा दाखला  

✅ उत्पन्नाचा दाखला  

✅ 7/12 उतारा आणि 8-अ उतारा  

✅ दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र (BPL कार्ड)  

✅ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र  

✅ पाणी उपलब्धतेचा दाखला (विहिरीसाठी)  

✅ तलाठ्याचे शिफारसपत्र  

✅ कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र  

✅ गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र  

✅ ग्रामसभेचा ठराव  

अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर लॉगिन करा: 

   MahaDBT पोर्टल  

  1. “शेतकरी योजना” पर्यायावर क्लिक करा.  
  2. “बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना” निवडा.  
  3. आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.  
  4. अर्ज सादर करा आणि पुढील प्रक्रियेसाठी कृषी सहाय्यक किंवा CSC केंद्राशी संपर्क साधा.  

महत्त्वाच्या सूचना

  • अनुदान मंजूर झाल्यानंतरच बोअरवेल खोदकाम करता येईल.  
  • अर्ज मंजुरीनंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.  
  • अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा CSC केंद्राला भेट द्या. 

बोअरवेल अनुदान योजना (Borewell Yojana 2025 Maharashtra) ही अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे. सिंचन सुविधा मिळाल्यास शेती उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यास मदत होईल. पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर MahaDBT पोर्टलवर अर्ज भरावा आणि योजनेचा लाभ घ्यावा.

🔴 हेही वाचा 👉 राज्यातील दुर्बल, विधवा महिलांसाठी सरकारची मदत योजना, दरमहा मिळणार ₹1500 अनुदान.

Share This Article