DA Hike 2025 Central Government Employees Salary Increase : केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) 2 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांचा महागाई सवलत (DR) 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर जाईल.
Central government employees DA hike News : यापूर्वी, जुलै 2024 मध्ये महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला होता. आता नवीन वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आणखी 2 टक्क्यांची वाढ होईल. ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे, त्यामुळे कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
महागाई भत्त्यात वाढीनंतर किती वाढणार वेतन?
जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 50,000 रुपये असेल, तर त्याला 53 टक्के महागाई भत्त्याच्या हिशोबाने ₹26,500 मिळत होते. आता 55 टक्के दराने हा भत्ता ₹27,500 होईल, म्हणजेच वेतनात प्रतिमहिना 1,000 रुपयांची वाढ होईल.
70,000 रुपयांच्या मूळ वेतनावर आधी महागाई भत्ता ₹37,100 होता, जो आता ₹38,500 होईल, म्हणजेच वेतनात 1,400 रुपयांची वाढ होईल.
जर मूळ वेतन ₹1,00,000 असेल, तर 53 टक्के महागाई भत्ता ₹53,000 होता, जो आता 55 टक्के दराने ₹55,000 होईल. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरमहा 2,000 रुपयांची वाढ होईल.
78 महिन्यांमध्ये प्रथमच 2% वाढ
गेल्या काही वर्षांमध्ये महागाई भत्ता दरवर्षी 3 ते 4 टक्क्यांनी वाढत होता. मात्र, 78 महिन्यांमध्ये (सुमारे 6.6 वर्षांमध्ये) प्रथमच केवळ 2 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी, 2018 मध्ये असाच 2 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यात 3 किंवा 4 टक्के वाढच करण्यात आली होती.
2 महिन्यांचा एरियर मिळणार
सरकारने मार्च महिन्यात महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांची बाकी (एरियर) मार्चच्या पगारासोबत मिळेल. याचा अर्थ, कर्मचाऱ्यांच्या वेतनात तीन महिन्यांचा महागाई भत्ता एकत्र जमा केला जाणार आहे.
जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 19,000 रुपये असेल, तर त्याला आधी महागाई भत्त्याच्या स्वरूपात ₹10,070 मिळत होते. 2 टक्के वाढीनंतर हा भत्ता आता ₹10,450 झाला आहे.
ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी आहे, कारण वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर वेतनवाढीचा हा निर्णय त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करणारा ठरणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 यांना मिळणार नाही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ, सर्वेक्षण कालावधी वाढवला.