Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2025 : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान सुधारणे आहे. विशेषतः सिंचनाच्या सुविधा निर्माण करून शेती अधिक लाभदायक बनवणे हे या योजनेचे मुख्य लक्ष्य आहे.
राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या विहिरी, बोअरिंग, पंप संच, वीज जोडणी आणि सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन उत्पादन वाढीला चालना मिळते.
शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधांसाठी आर्थिक मदत दिली जाते. त्यामध्ये नवीन विहीर खोदण्यास 2.5 लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये, इनवेल बोअरिंगसाठी 20 हजार रुपये, आणि ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी अनुक्रमे 50 हजार व 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तसेच, शेततळे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख रुपयांचे अनुदान मिळते.
योजनेतून मिळणारी सुविधा आणि पॅकेजेस
शेतकऱ्यांसाठी योजनेत विविध पॅकेजेस उपलब्ध असून, नवीन विहीर पॅकेज, जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज, तसेच शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण यासारख्या योजना आहेत. प्रत्येक पॅकेजमध्ये विहीर खोदणे, पंप संच बसवणे, वीज जोडणी आणि सूक्ष्म सिंचन सुविधा देण्यात येते.
पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Apply Online : या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असणे आवश्यक आहे. तसेच, अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 आणि 8 अ उतारा यांसारखी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
योजनेसाठी अर्ज ऑनलाईन स्वरूपात www.mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर भरावा लागतो. अर्जांची छाननी झाल्यानंतर जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेनंतर शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे. या योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होऊन उत्पन्न वाढविण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा.
🔴 हेही वाचा 👉 महिलांसाठी मोठी संधी, सरकारकडून 5 लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज.