Farmer ID Maharashtra Registration : शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध कृषी योजना आणि अनुदाने लागू करत असते. मात्र, या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) असणे आवश्यक आहे. अॅग्रीस्टॅक (AgriStack) या केंद्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अॅग्रीस्टॅक म्हणजे काय?
शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एका डिजिटल प्रणालीत संकलित करण्यासाठी केंद्र सरकारने अॅग्रीस्टॅक (AgriStack) ही प्रणाली सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ सहज मिळेल, तर सरकारला शेतीसंबंधी अचूक डेटा उपलब्ध होईल. या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यास अद्वितीय शेतकरी ओळख क्रमांक (Unique Farmer ID) दिला जाणार आहे.
फार्मर आयडीचे फायदे:
- सरकारी कृषी योजनांचा लाभ घेणे सोपे होणार.
- PM-Kisan योजनेसाठी पात्रता निश्चित करणे सोपे.
- शेतकरी कर्ज आणि किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करणे सुलभ.
- पीक विमा आणि नुकसान भरपाई यासाठी ऑनलाइन पडताळणी शक्य.
- किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेसाठी सहज नोंदणी करता येणार.
- शासनाच्या कृषी सल्ल्यांची माहिती वेळेवर मिळणार.
फार्मर आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड आणि आधार-संलग्न मोबाईल क्रमांक
- शेतजमिनीचे खाते क्रमांक
कोणाशी संपर्क साधावा?
- नागरी सुविधा केंद्र (CSC Center)
- ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) / कृषी सहायक / ग्राम विकास अधिकारी
फार्मर आयडी कसा काढायचा?
जर तुम्ही अद्याप तुमचा शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार केला नसेल, तर आजच नजीकच्या CSC केंद्रावर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. शेतकरी ओळख क्रमांक नसल्यास भविष्यात शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा (Government Schemes For Farmers 2025) लाभ मिळणार नाही.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेत काय बदल होणार? लाडक्या बहिणींसाठी कर्ज योजना.