Sarkari Yojana 2025: महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात आनंदाचा शिधा योजना (Anandacha Shidha Yojana) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि शिवभोजन थाळी या योजना केवळ निवडणुकीसाठी आणल्या होत्या असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारने आनंदाचा शिधा योजना पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2025 च्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2025) या योजनेसाठी कोणतीही तरतूद नाही, तसेच सरकारने यावर अधिकृतपणे कोणताही उल्लेख केला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या योजनांना अर्थसंकल्पात कात्री लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिंदे यांच्या योजनांना फटका
महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या होत्या. मात्र, अर्थसंकल्पात काही योजनांना निधी मिळालेला नाही. आनंदाचा शिधा योजना (Anandacha Shidha Yojana) यासाठी निधी न मिळाल्याने ती बंद होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी आदिवासी आणि समाजकल्याण विभागाच्या निधीचा वापर; अनेक योजनांना फटका.
विजय वडेट्टीवार यांची टीका
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, “एकनाथ शिंदे यांच्या योजनांचे महत्व आता संपले आहे. लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) आणि आनंदाचा शिधा योजना त्यांच्या नेतृत्वाखालील महत्त्वाच्या योजना होत्या. मात्र, आता त्या योजनांवर गदा आणली जात आहे.”
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “सरकारने आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि शिवभोजन थाळी या योजना केवळ निवडणुकीसाठी आणल्या होत्या. आता निवडणुका नाहीत, म्हणून त्या बंद केल्या जात आहेत.” महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 १२ मार्चपर्यंत हप्ता जमा करण्याचे आश्वासन, तरीही अनेक महिलांच्या खात्यात पैसे नाहीत!.