Ladki Bahin Yojana 2100 Rs Update Maharashtra : महाराष्ट्रातील करोडो महिलांना आर्थिक मदत देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा मासिक हफ्ता 1500 रुपयांवरूनवाढवून 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाची घोषणा होणार?
मागील वर्षी महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरू केली. ही योजना जुलै 2024 मध्ये लागू करण्यात आली होती, आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने या सध्या देण्यात येत असलेल्या 1500 रुपयांच्या रकमेचा वाढ करण्याचे आश्वासन दिले होते.
रोहित पवार यांचा सरकारला थेट सवाल!
मात्र, अद्याप ₹2100 संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधानसभेत सरकारला थेट प्रश्न विचारला –
“महायुती सरकारने महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, ते पैसे कधी मिळणार? याबाबत अधिवेशनात ठोस घोषणा होणार का?”
सरकारचे उत्तर – निर्णय योग्य वेळी घेतला जाईल!
या प्रश्नावर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री (Aditi Tatkare) यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की –
“लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत करणारे हे पहिले सरकार आहे. 2100 रुपयांसंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील.”
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
- अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
- अद्याप सरकारने कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही.
- विरोधी पक्ष सरकारवर दबाव वाढवत आहेत, त्यामुळे लवकरच स्पष्टता मिळू शकते.
लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थींना 2100 रुपयांची रक्कम कधी मिळेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. सरकारने अद्याप स्पष्ट उत्तर दिले नसले तरी पुढील काही दिवसांत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना बंद केली तर 10 योजना सुरू करता येतील.