Ladki Bahin Yojana 2100 Rupees Ajit Pawar Latest Announcement : राज्यातील महिलांसाठी महत्त्वाच्या असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ही योजना पुढील पाच वर्षे बंद केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, महिलांना दरमहा 1500 ऐवजी 2100 रुपये कधीपासून मिळणार, याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले की, “माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) आणि वीज माफी योजना आम्ही बंद केलेली नाही. काही तांत्रिक अडचणी आहेत, पण त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. महिलांना 2100 रुपये कधी द्यायचे, याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल.”
दरम्यान, इचलकरंजीतील विविध विकास प्रकल्प आणि महापालिकेच्या समस्यांबाबतही ते बोलले. इचलकरंजी महापालिकेच्या जीएसटी संबंधित प्रकरणावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
🔴 हेही वाचा 👉 बंद पडली लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पडताळणीची प्रक्रिया, अडीच कोटी महिलांसाठी महत्त्वाची माहिती.
राजकीय विषयांवर भाष्य करताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. विधानमंडळात उपस्थित राहिल्याशिवाय राज्याच्या प्रश्नांचा अर्थ समजत नाही, असे ते म्हणाले. “फक्त पाच-दहा मिनिटे हजेरी लावून काही समजत नाही. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती वेळ उपस्थित होते? त्यांनी कुठलाही मुद्दा मांडला नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना 2100 रुपये कधीपासून मिळणार, याची प्रतीक्षा असली तरी आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. सरकार ही योजना बंद करणार नसल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.
🔴 हेही वाचा 👉 केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, इतक्या टक्क्याने वाढला महागाई भत्ता.