Ladki Bahin Yojana 2100 Rupees Eknath Shinde Update : राज्यातील अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जातो.
लाडकी बहीण योजनेतील आर्थिक मदत
- जुलै 20264 पासून योजना सुरू
- दर महिन्याला 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा
- आतापर्यंत 9 हप्ते वितरित
- मार्च 2024 चा हप्ता जमा
2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
एकनाथ शिंदेंच मोठ विधान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल आहे की, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर 2100 रुपये दिले जातील. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील, असे आश्वासन दिले आहे.
🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्र सरकारकडून मुलींसाठी आर्थिक मदत, पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून, राज्याची अर्थव्यवस्था सुधारल्यानंतर 2100 रुपयांचा वाढीव हप्ता लागू केला जाईल. त्यामुळे महिलांना 2100 रुपये मिळण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 शेततळे खोदण्यासाठी सरकारकडून मंजूर झालं अनुदान, येथे करा अर्ज.