Ladki Bahin Yojana Update: ‘लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणं कठीण’, केंद्रीय मंत्र्यांच्या विधानामुळे वाढला संभ्रम

2 Min Read
Ladki Bahin Yojana 2100 Rupees Update News

Ladki Bahin Yojana Latest News : लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार याबाबत अजून स्पष्टता नसल्याने आधीच लाडक्या बहिणी संभ्रमात होत्या, त्यात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या विधानामुळे महिलांमध्ये चिंता वाढली आहे.

लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढणार की नाही?

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) देशभर चर्चेत आहे. सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात, आणि सरकारने हा हप्ता 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

रामदास आठवले यांचे मोठे विधान

महायुती सरकारच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान 2100 रुपयांचा हप्ता लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हा निर्णय लांबणीवर पडल्यामुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी या संदर्भात वक्तव्य करताना म्हटले –

“लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणं कठीण आहे. सरकारने महिलांना आश्वासन दिलं आहे, त्यामुळे पुढील बजेटपूर्वी त्यांना पैसे मिळावेत.”

🔥 हेही वाचा 👉 महिलांसाठी सर्वोत्तम बचत योजना कोणती?.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता फक्त 500 रुपये?

नमो शेतकरी योजना (Namo Shetkari Yojana) आणि लाडकी बहीण योजनेचा एकत्रित लाभ घेणाऱ्या महिलांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

नमो शेतकरी योजनेअंतर्गत महिलांना 12,000 रुपये मिळतात.

लाडकी बहीण योजनेच्या नियमांनुसार, वार्षिक 18,000 रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळू शकत नाही.

त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेतुन 1500 ऐवजी फक्त 500 रुपये मिळण्याची शक्यता आहे.


महिलांमध्ये नाराजी वाढणार?

राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. जर हा निर्णय अंतिम झाला, तर राज्य सरकारवरील आर्थिक बोजा 1400 कोटी रुपयांनी कमी होईल. मात्र, यामुळे लाखो महिलांना अपेक्षेपेक्षा कमी लाभ मिळेल, आणि यामुळे महिलांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 2100 रुपये कधी मिळणार?.


Share This Article