Ladki Bahin Yojana 2100 Rs Date : लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधीपासून मिळणार? अजित पवार यांची मोठी प्रतिक्रिया

2 Min Read
Ladki Bahin Yojana 2100 Rupees Update

Ladki Bahin Yojana 2100 Rupees Update : राज्य सरकारने कमी उत्पन्न गटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू केली असून, या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात मिळतात. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. 

Ladki Bahin Yojana Latest News : लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला गेल्या जुलैपासून सुरुवात झाली असून, आत्तापर्यंत एकूण 9 हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र, सरकारी तिजोरीवर योजनेचा ताण वाढत असल्याने 2100 रुपये प्रतिमहिना कधीपासून मिळणार, यावर अजूनही स्पष्टता नाही.

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana 2100 Rupees : यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यास आम्ही नकार दिलेले नाही, परंतु सरकारची आर्थिक स्थिती पाहून 2100 रुपये कधीपासून द्यायचे याबाबत (Ladki Bahin Yojana 2100 Rs Date) योग्य निर्णय घेतला जाईल. सर्व काही करता येत, पण पैशांच सोंग घेता येत नाही, अस अजित पवार म्हणाले.

🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana April Installment: एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात, पात्र महिलांना दिलासा.

Maharashtra Government Schemes Latest Updates 

  • शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती संकलन सुरू 
  • धान उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंत ₹20,000 मदतीचा निर्णय 
  • ऑनलाईन लॉटरीसंदर्भात समिती गठीत करण्याचा निर्णय

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणीच्या पैशावर दारुड्या पतीने मारला डल्ला; विरोध करणाऱ्या पत्नीवर कोयत्याने हल्ला.

Share This Article