Ladki Bahin Yojana 3000 Rupees Latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. मात्र आता 2100 ते 3000 रुपये देण्याचा विचार सरकार करत आहे.
राज्यातील गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत सध्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. मात्र, निवडणूक प्रचारादरम्यान महायुती सरकारने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही अजून 1500 रुपयेच देण्यात येत आहेत. त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार? असा प्रश्न महिलांना पडला आहे. यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर वाढीव रक्कम दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
परिणय फुके यांचे मोठे वक्तव्य:
भाजप नेते परिणय फुके यांनी यावर मोठे विधान केले आहे. ते म्हणाले,
“लाडकी बहीण योजना सुरूच राहील. या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आम्ही 2100 रुपये काय, तर 3000 रुपये देऊ शकतो, पण थोडा वेळ थांबावे लागेल. महिलांनी विश्वास ठेवावा, राज्याची परिस्थिती सुधारताच मदतीची रक्कम वाढवली जाईल.” अस ते म्हणाले.
🔴 हेही वाचा 👉 ‘लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणं कठीण’, केंद्रीय मंत्र्यांच्या विधानामुळे वाढला संभ्रम.