Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५०,०००, स्वतंत्र्य बचत गट तयार केल्यास १० लाख रुपयांपर्यंतची भांडवल

2 Min Read
Ladki Bahin Yojana Ajit Pawar Announcement

Ladki Bahin Yojana Ajit Pawar Announcement : महाराष्ट्र सरकारची माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी खूप महत्त्वाची ठरली असून, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य करत राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. 

नांदेडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, त्यांनी कधीच 2100 रुपये देण्याचे वचन दिले नाही. त्यांनी स्पष्ट केले की, राज्यातील १३ कोटी जनतेच्या आर्थिक व्यवस्थापनाचा विचार करावा लागतो आणि त्यानुसारच सरकार निर्णय घेईल. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती अनुकूल झाल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा विचार केला जाईल.

अजित पवारांचा नवा प्रस्ताव – महिलांसाठी ५०,००० रुपयांचे कर्ज

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर स्वयंरोजगारासाठीही संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अजित पवार यांनी सांगितले की, सरकार नवीन पर्याय घेऊन येत आहे, ज्यानुसार महिलांना ५०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. लाडकी बहीण योजनेतील 20 महिलांनी त्यांचा स्वतंत्र्य बचत गट तयार केल्यास, त्यांना एकत्रितपणे १० लाख रुपयांपर्यंतची भांडवल रक्कम मिळू शकते.

राज्यातील महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात येणार असून, प्रत्येक महिलेने महिन्याला 1500 रुपयांची परतफेड केल्यास त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी मदत मिळू शकते. सरकारकडून या योजनेवर काम सुरू असून, लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.

🔴 हेही वाचा 👉 Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2025: 5 लाखांपर्यंतचे अनुदान उपलब्ध.

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) एक महत्वपूर्ण पाऊल ठरत आहे. सरकारकडून योजनेत सुधारणा करत महिलांना अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

🔴 हेही वाचा 👉 ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून 3.15 लाख रुपयांपर्यंत अनुदान, असा करा अर्ज.

Share This Article