Ladki Bahin Yojana Update | Maharashtra Government Scheme Changes
Ladki Bahin Yojana Ajit Pawar Statement Beneficiary Changes : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आता फक्त गरीब महिलांसाठी लागू राहणार आहे, अस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल आहे. योजना घाईगडबडीत सुरु करण्यात आल्यामुळे काही आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना लाभ मिळाला होता, त्यामुळे आता योजनेत सुधारणा केली जाणार आहे.
अजित पवारांनी काय सांगितल?
✔ लाडकी बहीण योजना बंद होणार नाही – गरजू महिलांसाठी योजना सुरूच राहील.
✔ फक्त गरीब महिलांनाच लाभ – आर्थिक सक्षम महिलांना योजनेतून वगळले जाईल.
✔ ज्यांना लाभ मिळाला त्यांच्याकडून पैसे परत नाही – आधीच मिळालेला निधी मागे घेतला जाणार नाही.
✔ SC, ST साठी निधी वाढवणार – योजनेसाठी 40% अधिक निधी उपलब्ध केला जाईल.
✔ महिलांसाठी लोन प्रोग्राम – मुंबई बँकेकडून ₹10,000 – ₹25,000 पर्यंत कर्ज सुविधा मिळेल.
अजित पवारांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना स्पष्ट केल की, महाराष्ट्राचा वित्तीय आरोग्य (Fiscal Health) चांगला आहे आणि सरकारकडे योजना राबवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे.