Ladki Bahin Yojana April Installment Date Update : महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचाएप्रिल महिन्याचा हफ्ता (Ladki Bahin Yojana 10th Installment) लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्याचे हप्ते वेळेवर मिळाल्यानंतर आता लाखो महिलांना एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. सूत्रांनुसार, हा हप्ता 6 ते 10 एप्रिल या कालावधीत जमा होण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ आणि अंमलबजावणी
महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण (Mazi Ladki Bahin Yojana) अंतर्गत राज्यातील करोडो महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
✅ फेब्रुवारी हप्ता 8 मार्च रोजी (महिला दिन) जमा झाला होता.
✅ मार्चचा हप्ता यशस्वीपणे वितरित झाला आहे.
✅ एप्रिलचा हप्ता 6 ते 10 एप्रिलदरम्यान खात्यात येण्याची शक्यता आहे.
‘या’ महिलांना एप्रिल महिन्यात लाभ मिळणार नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक महिलांची नावे अपात्र ठरली असून, योजनेतून वगळल्या गेलेल्या महिलांकडून आधी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत.
🔴 अंदाजे 50 लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता
🔴 आतापर्यंत 9 लाखांहून अधिक महिलांची नावे वगळली गेली आहेत
🔴 अपात्र महिलांना एप्रिल महिन्यात हप्ता मिळणार नाही
🔥 हेही वाचा 👉 10वी पास महिलांना दरमहा ₹7,000 मिळणार! अर्ज कसा कराल? संपूर्ण माहिती.
योजना अपात्रतेची कारणे काय?
राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष निश्चित केले आहेत. त्यांची पूर्तता न करणाऱ्या महिलांना योजना लागू होणार नाही.
- आर्थिक निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना वगळले जाते.
- बँक खाते आधारशी संलग्न नसल्यास हप्ता जमा होऊ शकत नाही.
- योग्य कागदपत्रे नसल्यास अर्ज रद्द होतो.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांनी आपली बँक माहिती आणि आधार लिंकिंग अपडेट ठेवणे आवश्यक आहे.
🔥 हेही वाचा 👉 महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी योजनेद्वारे शेतकऱ्यांना कसा मिळतो आर्थिक लाभ? जाणून घ्या.