Ladki Bahin Yojana: ‘या’ लाभार्थींची घरोघरी जाऊन तपासणी, शासनाची कठोर कारवाई

2 Min Read
Ladki Bahin Yojana Beneficiary Verification Maharashtra

Ladki Bahin Yojana Beneficiary Verification Maharashtra : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाने आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची पुनर्पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आता प्रशासन घरोघरी जाऊन तपासणी करत आहे.

मागील काही महिन्यांत लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा महिलांना मिळाला. राज्य सरकारच्या या योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळाला असून, विधानसभेसाठी सत्ताधारी पक्षासाठीही ही योजना प्रभावी ठरली. मात्र, काही अपात्र लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले आहे.

चारचाकी असलेल्या लाभार्थ्यांची चौकशी सुरू

राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) कार्यालयाच्या मदतीने चारचाकी वाहनधारकांची यादी तयार केली आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे.

घरात चारचाकी असलेल्या महिलांची नावे योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली जाणार असून, शासनाकडून राज्यभरात ही तपासणी मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार आहे. शासनाने अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून स्वतःहून माघार घेण्याचा पर्यायही दिला आहे. चुकीच्या आर्थिक निकषांवर लाभ घेतलेल्या महिलांना योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज मागे घेण्याची संधी दिली जात आहे.

योजनेत कठोर अंमलबजावणीचा इशारा

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. मात्र, या योजनेचा गैरवापर होऊ नये यासाठी शासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आगामी काळात आणखी मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 16 हजार लाभार्थींचे आधार क्रमांक जुळत नसल्याचे समोर! अनेक महिलांनी चुकीची माहिती भरल्याचे स्पष्ट.

Share This Article