Ladki Bahin Yojana Four Wheeler Disqualification : आता घरोघरी तपासणीसाठी येणार अंगणवाडी सेविका

2 Min Read
Ladki Bahin Yojana Benefits Verification Maharashtra Government

Ladki Bahin Yojana Four Wheeler Disqualification : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या घरात कार आहे का? तपासणी मोहीम लवकरच सुरू होणार!

Ladki Bahin Yojana Car Verification: महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहन असल्यास त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. महिला व बालविकास विभागाने आरटीओकडून प्राप्त झालेल्या यादीच्या आधारे अंगणवाडी सेविकांना तपासणीसाठी नियुक्त केले आहे.

योजनेतील नवीन अंमलबजावणीचे मुख्य मुद्दे:

✔ अंगणवाडी सेविका घरोघरी भेट देऊन लाभार्थीच्या कुटुंबाकडे कार आहे का याची खातरजमा करणार.  

✔ कुटुंबातील एका व्यक्तीकडे चारचाकी वाहन असल्यास लाभ रद्द होईल.

✔ विभक्त राहणाऱ्या महिलांना (ज्या पती आणि मुलांसोबत स्वतंत्र राहतात) लाभ सुरू राहणार.

✔ ५ एकरपेक्षा जास्त शेती, शासकीय नोकरी असलेल्या महिलांना लाभ नाकारला जाणार.

✔ योजनेच्या ₹2.5 लाखांच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

सरकारचा नवीन निर्णय का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आली होती. अर्ज करताना स्वयं घोषणापत्रातुन चारचाकी वाहन नसल्याची हमी महिलांकडून घेण्यात आली होती. मात्र, अर्ज पडताळणी न करता सरसकट लाभ दिला गेला. यानंतर सरकारने कार असलेल्या लाभार्थींनी स्वयंप्रेरणेने योजना सोडावी असे आवाहन केले, परंतु याला कमी प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔴 हेही वाचा 👉 राज्यातील दुर्बल, विधवा महिलांसाठी सरकारची मदत योजना, दरमहा मिळणार ₹1500 अनुदान.

तपासणी आणि अंमलबजावणी कशी होणार?

✅ आरटीओकडून प्राप्त यादीच्या आधारे तपासणी होणार. 

✅ अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन वाहन तपासणी करणार.

✅ कुटुंबात कार असल्यास लाभ रद्द केला जाईल.

✅ कार दुसऱ्याच्या नावावर असेल आणि लाभार्थी विभक्त राहत असल्यास लाभ सुरू राहणार. 

✅ तपासणीमध्ये पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थींना वगळले जाईल.

योजनेतील महत्त्वाचे आर्थिक निकष:

✔ वार्षिक उत्पन्न मर्यादा – ₹2.5 लाख पेक्षा जास्त नसावे.  

✔ 5 एकरपेक्षा जास्त शेती असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही.  

✔ घरातील सदस्य शासकीय नोकरीत असलेल्या महिलांना अपात्र ठरवले जाईल. 

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधीपासून मिळणार?.

Share This Article