Ladki Bahin Yojana Double Benefit : लाखो लाडक्या बहिणींनी दुहेरी लाभ घेतल्याचा प्रकार उघड, कारवाई करण्याच्या तयारीत सरकार

2 Min Read
Ladki Bahin Yojana Double Benefit Issue Maharashtra

Ladki Bahin Yojana Double Benefit Issue Maharashtra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सव्वा आठ लाख लाभार्थीं महिलांनी इतर शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे, दुहेरी लाभ मिळत असल्या कारणास्तव काही लाडक्या बहिणींना वर्षाला 30 हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळत आहे. त्यामुळे सरकार यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

लाडक्या बहिणींनी दुहेरी लाभ घेतल्याचा प्रकार उघड

राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र, काही लाभार्थींनी नमो शेतकरी योजनेचा लाभही घेतल्याचे उघडकीस आले आहे.

नमो शेतकरी योजना आणि दुहेरी लाभ

नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून 6000 रुपये आणि केंद्र सरकारकडून 6000 रुपये असे एकूण 12000 रुपये मिळतात. त्यामुळे काही लाभार्थींना एकाच वेळी लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचा लाभ मिळत आहे.

सव्वाआठ लाख महिलांना दुहेरी लाभ

लोकमतच्या वृत्तानुसार, तब्बल सव्वाआठ लाख महिलांनी दोन्ही योजनांचा लाभ घेतला आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत आहे.

महिलांचा लाभ कमी करण्याचा प्रस्ताव

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला 18000 रुपये मिळतात. तर, नमो शेतकरी योजनेअंतर्गत 12000 रुपये दिले जातात. म्हणजेच, काही लाभार्थींना वर्षाला 30 हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळत आहे. त्यामुळे या महिलांचा लाभ कमी करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे.

🔴 हेही वाचा 👉 आता घरोघरी तपासणीसाठी येणार अंगणवाडी सेविका.

लाडकी बहीण योजना कायम राहणार

राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, लाडकी बहीण योजना इथून पुढेही सुरू राहणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे की, पात्र महिलांवर अन्याय होणार नाही आणि सरकार लाडक्या बहिणींचा आर्थिक लाभ 2100 रुपये करण्याचा विचार करत आहे.

🔴 हेही वाचा 👉 राज्यातील दुर्बल, विधवा महिलांसाठी सरकारची मदत योजना, दरमहा मिळणार ₹1500 अनुदान.

Share This Article