Ladki Bahin Yojana New Update : राज्यात सुरू असलेल्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक असलेली लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बंद होणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेसह शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा आणि अन्य योजनाही चालू राहतील. राज्यातील एकही पात्र लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदेंनी दिला.
महायुती सरकारच्या सर्व योजना सुरूच राहणार
एबीपी माझाच्या व्हिजन महाराष्ट्र या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, महायुती सरकारने कोणतीही योजना बंद केली नाही. माझ्या कार्यकाळात सुरू झालेल्या सर्व योजना अजूनही सुरू आहेत आणि पुढेही सुरू राहतील.
- लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana)
- शिवभोजन थाळी
- आनंदाचा शिधा योजना
- लेक लाडकी योजना
- शासन आपल्या दारी योजना
या सर्व योजना सुरू राहणार असल्याची खात्री शिंदेंनी दिली. मात्र, योजनांचा लाभ फक्त पात्र लाभार्थींनाच मिळेल. ज्या महिला सरकारच्या निकषात बसतात, त्यांनाच योजना लागू होतील.
मुख्यमंत्री पदावरून नाराजी नाही – शिंदेंचा खुलासा
मुख्यमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये नाराजी आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला असता, मुख्यमंत्री पदावरून कोणतीही नाराजी नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंनी दिले. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी स्वतः फोन केला होता आणि महायुती म्हणून आपण एकत्र असल्याचे सांगितले होते. त्यामुळे, मुख्यमंत्री पदासाठी कोणतीही नाराजी नाही.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचा बदल, सरकारचा नवा प्रस्ताव.
राजकीय टीका आणि विकासाच्या योजना
- नागपूर हिंसाचार, मुंबईचा विकास, गावाकडची शेती, नवीन हिल स्टेशन प्रकल्प यावरही शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
- साताऱ्यात न्यू महाबळेश्वर हिल स्टेशन विकसित करण्याचा सरकारचा संकल्प आहे, असेही त्यांनी सांगितले.
निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच लाभ
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “निकषात बसणाऱ्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. चारचाकी गाडी असलेल्या किंवा निकषात नसलेल्या महिलांना योजना लागू होणार नाही.”
राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजना, शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा आणि इतर सर्व योजना निरंतर सुरू राहतील, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी दिला आहे. मुख्यमंत्री पदावरून कोणताही मतभेद नाही आणि महायुती सरकार फेव्हिकॉलसारख घट्ट राहणार, असही त्यांनी ठामपणे सांगितल.
🔴 हेही वाचा 👉 Borewell Yojana Maharashtra 2025 : बोअरवेल खोदण्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत अनुदान, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.