Ladki Bahin Yojana Eligibility Criteria Ajit Pawar Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची छाननी सुरू असून सरकारने गरजू महिलांचे निकष स्पष्ट केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोण पात्र आणि कोण अपात्र ठरणार, याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पात्र महिलांचे निकष स्पष्ट केले आहेत.
“लाडकी बहीण योजना गरजू महिलांसाठी आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, झोपडपट्टीत राहतात, कष्टाचं जीवन जगतात, निराधार आहेत, त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. तसेच, ज्यांना त्यांची मुलं, सुना किंवा जावई सांभाळत नाहीत, अशा महिलांनाही योजना लागू होईल,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अपात्र ठरणाऱ्या महिला कोण?
लाडकी बहीण योजनेचा गैरलाभ घेतल्याच्या तक्रारी आल्याने सरकारकडून अर्जांची छाननी केली जात आहे. या प्रक्रियेमुळे खालील गटातील काही महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही:
- ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे
- आर्थिक सक्षम असूनही लाभ घेत असलेल्या महिला
- योजना फक्त गरजू आणि गरीब महिलांसाठी असल्याने आता इतरांना अपात्र ठरवले जाऊ शकते
2100 रुपये कधी मिळणार? अजित पवार यांचे उत्तर
निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांनी स्पष्ट केले की,
“महायुती सरकार पाच वर्षांसाठी आहे. आम्ही मुलभूत प्रश्न सोडवून परिस्थिती सुधारल्यावर वाढीव रक्कम देऊ. काही जण म्हणत होते की योजना बंद होईल, पण गरीब महिलांसाठी ही योजना कायम सुरु राहील.”
सणांसाठी विशेष तरतूद
“ज्यांना चुकीने पैसे मिळाले ते परत घेतले जाणार नाहीत. तसेच, रक्षाबंधन, भाऊबीज, होळी यांसारख्या मोठ्या सणांसाठी लवकरच विशेष रक्कमही दिली जाईल,” असेही पवार यांनी सांगितले.
2100 ते 3000 रुपयांची वाढीव मदत कधी मिळणार हे निश्चित नसले तरी. पात्र महिलांसाठी योजना सुरूच राहील हे नक्की. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना सणांसाठी विशेष रकमेची तरतूद करणार असल्याचही अजित पवार यांनी स्पष्ट केल आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये?.