Ladki Bahin Yojana: बंद पडली लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पडताळणीची प्रक्रिया, अडीच कोटी महिलांसाठी महत्त्वाची माहिती

2 Min Read
Ladki Bahin Yojana Eligibility Verification Update

Ladki Bahin Yojana Eligibility Verification Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. मात्र, अनेक महिलांनी अपात्र असूनही योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आल्याने अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली होती. पण आता ही पडताळणी प्रक्रिया बंद पडली असल्याची माहिती समोर आली आहे.  

महिला लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारने आयकर विभागाकडे माहिती मागवली होती. योजनेच्या अटींनुसार, वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपर्यंत असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, काही महिलांचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असूनही त्यांनी लाभ घेतल्याचे आढळून आल्याने तपासणी सुरू करण्यात आली होती.

तथापि, आयकर विभागाने अद्याप संपूर्ण माहिती राज्य सरकारला पुरवलेली नाही, तसेच या तपासणीत सहकार्य करण्यास असहमती दर्शवली आहे. यामुळे अर्जांची पडताळणी रखडली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून या माहितीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येत आहे, आणि ती मिळाल्यानंतर पुढील तपासणी प्रक्रियेस सुरुवात होईल.

🔴 हेही वाचा 👉 महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची संपूर्ण माहिती.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण दिले होते. योजनेच्या अटींनुसार, 21 ते 65 वयोगटातील महिलांनाच लाभ दिला जातो. त्यामुळे 65 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ आपोआप बंद केला जातो. सध्या, वयोमर्यादा ओलांडल्यामुळे 1.20 लाख महिलांचे लाभ थांबवण्यात आले आहेत. याशिवाय, विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांनाही योजनेचा लाभ दिला जात नाही. 

🔴 हेही वाचा 👉 कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँक कर्जाची वसुली कशी करते? जाणून घ्या नियम.

Share This Article