Ladki Bahin Yojana Husband Attacks Wife For Money : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) निवडणुकीत महत्त्वाची ठरली होती. मात्र, आता या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात काही गंभीर बाबी समोर येत आहेत. शासनाने योजनेच्या अटींमध्ये बदल करत चारचाकी वाहन असलेल्या महिलांना अपात्र ठरवले आहे. आतापर्यंत 9 लाखांहून अधिक महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
Solapur News : लाडकी बहीण योजना महिलांसाठी आर्थिक मदतीचा आधार ठरत असली, तरी काही दारुडे पती या पैशांचा गैरवापर करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशाच एका प्रकारात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लोणी गावात एका लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे पतीने दारूवर खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पत्नीने जाब विचारताच पतीचा कोयत्याने हल्ला
याप्रकरणी संबंधित महिलेने तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पत्नीने पैशांबाबत विचारणा केली असता पतीने तिला कोयत्याने मारहाण केली. या घटनेत पत्नी जखमी झाली असून, सासूवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित पवारांचा मोठा खुलासा
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे की, “लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.” मात्र, अटी व शर्तींमध्ये सुधारणा केली जात आहेत. अजित पवार यांनी सांगितले की योजनेत काही नवीन बदल करण्यात येत असून, पुढील 5 वर्षे ही योजना सुरू राहील.
🔴 हेही वाचा 👉 एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात, पात्र महिलांना दिलासा.