Ladki Bahin Yojana Loan Scheme : लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना राज्य सरकारने नवीन आर्थिक मदतीचा पर्याय दिला आहे. महिलांना गटाच्या स्वरूपात 10 लाखांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. मात्र, योजनेच्या वाढीव 2100 रुपयांबाबत अजून निर्णय झालेला नाही. याच दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महिलांसाठी नवीन पर्याय जाहीर केला आहे.
“राज्य सरकारकडे आर्थिक मर्यादा असल्या तरी, महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून 50 हजारांपर्यंतचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. 20 महिलांचा गट तयार करून 10 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते, आणि त्यावरून त्या स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
10 लाखांचे कर्ज कसे मिळेल?
लाडकी बहीण योजनेतील 20 महिलांचा गट तयार करावा लागेल.
प्रत्येकी 50,000 रुपये कर्ज मिळेल, म्हणजे गटाला 10 लाख रुपये मिळतील.
या रकमेचा वापर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी करता येईल.
व्यवसायाच्या उत्पन्नातून हप्ता फेडण्याची सोय करण्यात येईल.
2100 रुपये कधी मिळणार? अजित पवार यांचे उत्तर
सरकारने यापूर्वी पात्र महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजित पवार यांनी स्पष्ट केले की,
“सध्या राज्य सरकारकडे मोठा खर्च आहे. पण परिस्थिती सुधारताच महिलांना 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला जाईल.”
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता 6 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना आता दरमहा मिळणाऱ्या रकमेसोबतच व्यवसायासाठी कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 पात्रता निकष स्पष्ट! लाडक्या बहिणींना मोठ्या सणांसाठी विशेष रक्कम.