Ladki Bahin Yojana Maharashtra Aditi Tatkare Clarification : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो. मात्र, काही महिलांनी योजनेच्या निकषांत बसत नसतानाही अर्ज केले असल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आल्याच स्पष्ट झाल आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील 15 हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच वृत्त काही माध्यमांनी दिल होत.
मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट करत या वृत्ताला दिशाभूल करणारे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केल की, रायगड जिल्ह्यातील 15 हजार महिलांना योजनेतून अपात्र करण्यात आल्याचा दावा चुकीचा असून, ही प्रक्रिया ऑक्टोबर 2024 पूर्वीच पार पडली होती.
राज्य सरकारने 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी योजनेचे निकष जाहीर केले होते. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांनी अर्जांची छाननी करून पात्र आणि अपात्र अर्जदारांची यादी तयार केली होती. रायगड जिल्ह्यातील एकूण 6 लाख अर्जांपैकी 15,849 अर्ज छाननी प्रक्रियेतच अपात्र ठरले होते. त्यामुळे आता नव्याने कोणालाही अपात्र ठरवल्याचा प्रश्नच येत नाही, असही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केल.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना मार्च 2025 पर्यंतचा संपूर्ण सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे. अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ दिला गेलाच नव्हता, त्यामुळे त्यांना पुन्हा अपात्र ठरवल्याचा दावा चुकीचा असल्याच मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटल आहे.
🔴 हेही वाचा 👉 तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होतोय का? कस तपासाव आणि काय कराव?.
महायुती सरकार राज्यातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कटिबद्ध आहे. एकाही पात्र भगिनीवर अन्याय होणार नाही, याची हमीही अदिती तटकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिली आहे.
🔴 हेही वाचा 👉 या शेतकऱ्यांना आता दरवर्षी मिळणार 9 हजार रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती.