Ladki Bahin Yojana News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mazi Ladki Bahin Yojana) सध्या चर्चेत आहे. निवडणुकीदरम्यान महिलांना या योजनेची हमी देण्यात आली होती. मात्र, आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या विधानामुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे. “लाडकी बहीण योजना बंद केली, इतर नवीन योजना सुरू करता येतील”, असे ते म्हणाले, ज्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
रामदास कदमांच वक्तव्य आणि बजेटबाबत चिंता
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी नुकतेच पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “लाडकी बहीण योजनेसाठी सरकार मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत आहे. जर ही योजना बंद केली, तर त्याऐवजी इतर महत्त्वाच्या योजना सुरू करता येतील.” तसेच, त्यांनी पुढे म्हटले की, “सरकारला अर्थसंकल्प पाहून निर्णय घ्यावा लागतो. सध्या लाडकी बहीण योजनेसाठी 30,000 कोटींपेक्षा जास्त खर्च केला जात आहे. त्यामुळे विकासकामांसाठी हा खर्च योग्य रीतीने व्यवस्थापित करावा लागतो.”
लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक ताण?
महिला आणि बालकल्याण विभागासाठी 31,907 कोटी रुपये इतका मोठा निधी या वर्षी राखून ठेवण्यात आला आहे. विरोधकांच्या मते, ही वाढ लाडकी बहीण योजनेमुळे झाली आहे. त्याचबरोबर इतर विभागांसाठी करण्यात आलेली तरतूद अशी आहे –
- ऊर्जा विभाग: 21,534 कोटी रुपये
- सार्वजनिक बांधकाम विभाग: 19,079 कोटी रुपये
- शालेय शिक्षण विभाग: 2,900 कोटी रुपये
- उच्च शिक्षण: 810 कोटी रुपये
- दुग्धविकास विभाग: केवळ 5 कोटी रुपये
🔴 हेही वाचा 👉 महिला सशक्तीकरणासाठीच्या योजनांबाबत सरकारची भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
विरोधकांनी या वक्तव्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. “रामदास कदम यांचे पुत्र रवींद्र कदम सरकारमध्ये मंत्री आहेत. जर त्यांचे वडीलच लाडकी बहीण योजनेवर प्रश्न उपस्थित करत असतील, तर सरकारचा नेमका काय हेतू आहे?” असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, पण रकमेत वाढ नाही.
महिला लाभार्थींमध्ये संभ्रम
सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असला तरी, भविष्यात हा निधी कायम राहील का, यावर आता महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) निश्चित करण्यात आलेला 30,000 कोटींचा निधी वर्षभर पुरणार का? आणि मग 2100 रुपये कुठून देणार? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींच्या निधीत कपात तर शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, राज्यात कोणत्याही नवीन योजना नाहीत.