Ladki Bahin Yojana Update Ajit Pawar Latest Statement : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मात्र योजनेत काही सुधारणा केल्या जातील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल आहे. विधानसभेत उत्तर देताना, त्यांनी सांगितल की, ज्या लाभार्थ्यांची नाव योजनेतून वगळली गेली आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत.
अजित पवारांनी काय स्पष्ट केल?
✔ योजना बंद होणार नाही – गरीब महिलांसाठी योजना सुरूच राहील.
✔ अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत नाही – ज्या महिलांना यापूर्वी लाभ मिळाला, त्यांच्याकडून पैसे मागितले जाणार नाहीत.
✔ सुधारणा होणार, अन्याय नाही – गरजू महिलांना शंभर टक्के लाभ मिळेल.
✔ योजनेत बदल आवश्यक – नवीन अंमलबजावणीत त्रुटी सुधारल्या जातील.
अजित पवारांनी स्पष्ट केल की, लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, आणि गरजू महिलांवर कुठलाही अन्याय होणार नाही. यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.