Lakhpati Didi Yojana: महिलांसाठी मोठी संधी, सरकारकडून 5 लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज

2 Min Read
Lakhpati Didi Yojana Loan Scheme Apply Online

Lakhpati Didi Yojana Loan Scheme Apply Online : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Yojana 2025) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते, तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत महिलांना एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते आणि त्यावर कोणतेही व्याज द्यावे लागत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही आपल्या भाषणांमध्ये अनेक वेळा या योजनेचा उल्लेख केला आहे. या योजनेचा उद्देश महिलांना स्वयंरोजगाराच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.

लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना स्वयं सहायता समूहाचा भाग व्हावे लागते. एकत्र येऊन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या महिलांना आर्थिक मदतीसाठी सरकारकडे अर्ज करता येतो. त्यासाठी त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा स्पष्ट आराखडा तयार करून तो संबंधित स्वयं सहायता समूहाकडे सादर करावा लागतो. समूहाद्वारे हा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल. आणि त्यानंतर अधिकाऱ्यांकडून व्यवसायाच्या आराखड्याची पडताळणी केली जाईल. जर तो मान्य केला गेला, तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज दिले जाईल.

लखपती दीदी योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, पासपोर्ट साईझ फोटो आणि मोबाईल नंबर यांसारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.  

लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Yojana) स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी मोठी संधी आहे. सरकारच्या मदतीने स्वतःचा व्यवसाय उभारू इच्छिणाऱ्या महिलांना ही योजना आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने नवी वाट निर्माण करून देत आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना 10 लाखांचे कर्ज उपलब्ध.

Share This Article