Lek Ladki Yojana 2025 : महाराष्ट्र सरकारकडून मुलींसाठी आर्थिक मदत, पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

4 Min Read
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Benefits Eligibility

Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Benefits & Eligibility : महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून “लेक लाडकी योजना” (Lek Ladki Yojana Maharashtra) सुरू केली असून, या योजनेद्वारे राज्यातील मुलींसाठी आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेत सुधारणा करून ही योजना लागू करण्यात आली असून, या योजनेचा उद्देश मुलींच्या जन्मदरात वाढ, शिक्षणास चालना, बालमृत्यू दर कमी करणे, कुपोषण रोखणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करणे आणि बालविवाह रोखणे आहे.

लेक लाडकी योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक लाभ

राज्य सरकारकडून 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत खालीलप्रमाणे असेल –

  • मुलीच्या जन्मानंतर – ₹5,000  
  • इयत्ता 1ली प्रवेश – ₹6,000  
  • इयत्ता 6वी प्रवेश – ₹7,000  
  • इयत्ता 11वी प्रवेश – ₹8,000  
  • वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर – ₹75,000  

लेक लाडकी योजनेसाठी पात्रता निकष

लेक लाडकी योजना केवळ महाराष्ट्रासाठीच लागू असून, त्यासाठी खालील अटी व शर्ती लागू असतील –  

  1. केवळ पिवळी आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांसाठी ही योजना लागू आहे.  
  2. 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.  
  3. एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास, फक्त मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.  
  4. पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.  
  5. दुसऱ्या अपत्याच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास, एक किंवा दोन्ही मुलींना लाभ मिळेल.  
  6. पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाखाच्या आत असावे. 
  7. बँक खाते महाराष्ट्रातील बँकेत असणे आवश्यक आहे.

🔴 हेही वाचा 👉 बोअरवेल खोदण्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत अनुदान, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत –  

  • मुलीचा जन्म दाखला
  • पालकांचे आधार कार्ड
  • कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला  
  • लाभार्थीचे बँक खाते आणि पासबुकची छायांकित प्रत 
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)  
  • लाभार्थीच्या शिक्षणाचा दाखला (लाभाच्या वेळी आवश्यक)  
  • अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र (अंतिम लाभासाठी)  

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे करावा?

अंगणवाडी सेविकांकडून लेक लाडकी योजनेसाठी अर्ज स्वीकारले जातील. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत/नगरपालिका), महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या कार्यालयातही अर्ज उपलब्ध आहेत.

🔴 हेही वाचा 👉 महिलांसाठी सरकारची मदत योजना, दरमहा मिळणार ₹1500 अनुदान.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Lek Ladki Yojana Maharashtra Online Apply : ही योजना DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने कार्यान्वित केली जात असल्याने लाभार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जाईल.  

  1. ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका आणि शहरी भागात मुख्य सेविका अर्ज स्वीकारतील.  
  2. संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) अर्जाची पडताळणी करतील.  
  3. जिल्हा कार्यक्रम अधिकारी अर्जाची अंतिम मंजुरी देतील.  
  4. मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांकडे सादर केली जाईल. 
  5. मंजूर लाभार्थ्यांना मुलीच्या आणि आईच्या संयुक्त बँक खात्यावर थेट आर्थिक मदत जमा केली जाईल. 

स्थलांतरित कुटुंबांना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळेल का?

✅ जर लाभार्थी कुटुंबाने योजनेतील काही टप्पे पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर केले असेल, तर नवीन जिल्ह्यात अर्ज करता येईल.  

✅ जर लाभार्थी कुटुंबाने काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर दुसऱ्या राज्यात स्थलांतर केले असेल, तर पुढील टप्प्यांचा लाभ घेण्यासाठी राज्यस्तरीय कार्यालयात थेट अर्ज करावा लागेल.  

महत्त्वाची माहिती

  • लेक लाडकी योजना सध्या 5 वर्षांसाठी लागू आहे.  
  • यानंतर पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल. 
  • योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व अटी व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.  

🔴 हेही वाचा 👉 तुम्ही पात्र आहात का? या सोप्या पद्धतीने तपासा.

Share This Article