Loan Recovery Rules After Borrower Death : आजच्या काळात अनेक लोक विविध गरजांसाठी बँकांकडून कर्ज घेतात. गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा पर्सनल लोन घेतल्यानंतर कर्जदाराने ते ईएमआयच्या स्वरूपात परतफेड करणे आवश्यक असते. मात्र, जर कर्जदाराचा अचानक मृत्यू झाला, तर थकीत कर्ज कोणाकडून वसूल केले जाते? अशा परिस्थितीत बँका काय पावले उचलतात? याबाबतचे नियम काय आहेत, याची माहिती आपल्याला असली पाहिजे.
कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँक सर्वप्रथम सहअर्जदाराशी संपर्क साधते. जर कर्ज घेताना सहअर्जदार असला, तर त्याला कर्जाची जबाबदारी पार पाडावी लागते. मात्र, सहअर्जदार नसल्यास किंवा सहअर्जदाराने परतफेडीला नकार दिल्यास, बँक कर्जासाठी दिलेल्या हमीदाराशी (गॅरंटर) संपर्क साधते.
जर गॅरंटरनेही कर्जाची परतफेड करण्यास असमर्थता दर्शवली, तर बँक कर्जदाराच्या कायदेशीर वारसांना थकीत रक्कम भरण्यास सांगते. कायदेशीर वारसांना वारसहक्कानुसार मालमत्ता मिळते, मात्र त्याचवेळी कर्जाची जबाबदारीही पार पाडावी लागते.
बँक वसुलीसाठी कोणते पर्याय वापरते?
जर सहअर्जदार, गॅरंटर किंवा वारसांनी कर्ज फेडले नाही, तर बँका शेवटचा उपाय म्हणून मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया राबवते. गृहकर्ज किंवा वाहन कर्ज घेतले असेल, तर बँक त्या मालमत्तेवर हक्क मिळवते आणि लिलावाच्या माध्यमातून त्याची विक्री करून कर्जाची वसुली करते.
पर्सनल लोन किंवा इतर कोणतेही बिनहमतीचे कर्ज घेतले असेल, तर बँक मृत व्यक्तीच्या इतर मालमत्तेवर दावा दाखल करून ती विक्री करण्याचा प्रयत्न करते.
🔴 हेही वाचा 👉 एसबीआयच्या नव्या नियमामुळे ग्राहक त्रस्त, खरेदी करावा लागणार नवीन मोबाईल.
कर्ज विमा असल्यास काय होते?
काही कर्जदार कर्ज घेताना लोन इन्शुरन्स (Loan Insurance) घेतात. अशा प्रकरणांमध्ये कर्जदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर कोणताही आर्थिक भार येत नाही, कारण विमा कंपनी संपूर्ण कर्जाची रक्कम बँकेला भरते.
कर्जदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाने कायदेशीर प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. बँकेकडून येणाऱ्या नोटिसकडे दुर्लक्ष करू नये आणि वेळीच योग्य त्या सल्लागाराची मदत घ्यावी.
.🔴 हेही वाचा 👉 महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची संपूर्ण माहिती.