Saur Krushi Pump Yojana: शेतीला विजेशिवाय दिवसा पाणी द्या! सरकारच्या नवीन योजनेचा लाभ कसा घ्याल?

2 Min Read
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Apply Online

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Apply Online : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारने “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित दरात सौर पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे वीजबिलाचा खर्च वाचेल आणि दिवसा शेतीला पाणी देणे शक्य होईल.  

पात्रता निकष काय आहेत?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी लागू होतात:

✅ सिंचनासाठी पाण्याचा स्रोत असावा – शेततळे, विहीर, बोअरवेल किंवा बारमाही वाहणाऱ्या नदी/नाल्याच्या शेजारील शेतकरी पात्र आहेत.  

✅ महावितरणकडून पडताळणी – शेतकऱ्यांकडे शाश्वत पाणी स्रोत असल्याचे महावितरण तपासेल.  

✅ अनुदानासाठी पात्र शेतकरी – ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना-1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना यांचा लाभ घेतलेला नाही, तेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

🔴 हेही वाचा 👉 पीएम किसानचे पैसे मिळणे थांबले? जाणून घ्या संभाव्य कारणे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

✅ 7/12 उतारा (पाण्याचा स्रोत नमूद असणे आवश्यक)

✅ मालकी हक्क दर्शविणारा ना हरकत दाखला

✅ आधार कार्ड

✅ बँक पासबुक

✅ पासपोर्ट आकाराचा फोटो

✅ जातीचे प्रमाणपत्र (SC/ST/OBC साठी लागू)

✅ डार्क झोन प्रमाणपत्र (जर पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असेल तर)

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – अर्ज कसा कराल?

1️⃣ SOLAR MTSKPY पोर्टलला भेट द्या.

2️⃣ “सुविधा” टॅबवर क्लिक करून नवीन अर्ज भरा.  

3️⃣ वैयक्तिक माहिती, रहिवासी पत्ता, शेती व बँक तपशील भरा.

4️⃣ अर्ज सबमिट केल्यानंतर पोहोच पावती मिळेल.

5️⃣ कोणतीही अडचण आल्यास तालुका महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधा.

🔴 हेही वाचा 👉 ‘सीएम डॅश बोर्ड’ शासनाच्या सर्व योजनांची आणि सेवांची माहिती एका क्लिकवर!.

सौर कृषी पंप योजनेचे फायदे

✅ वीजबिल कमी होईल आणि शेतीचा खर्च वाचेल.

✅ दिवसा पाणीपुरवठा करण्याची सुविधा मिळेल.

✅ शेतीला शाश्वत सिंचन उपलब्ध होईल.

✅ केंद्र व राज्य सरकारकडून आर्थिक अनुदानाचा लाभ मिळेल.

✅ डिझेल किंवा विजेच्या तुलनेत कमी खर्चात शेती करता येईल.

🔴 हेही वाचा 👉 ‘हे’ ॲप डाउनलोड केल्यास होऊ शकते शेतकऱ्यांचे बँक खाते रिकामे, शेतकऱ्यांनी काय करावे?.

Share This Article