Maharashtra Dudh Anudan News : राज्यातील गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध अनुदान कधी जमा होणार (Dudh Anudan Kadhi Jama Honar) हा प्रश्न पडलेला. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीसाठी अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने ₹785 कोटींची तरतूद केली होती. मात्र, प्रलंबित अनुदानासाठी केवळ ₹339 कोटीच दुग्ध विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील ₹435 कोटींचे अनुदान अजूनही प्रलंबित आहे.