महाराष्ट्रात नवीन पीक विमा योजना; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा Maharashtra New Crop Insurance Scheme

2 Min Read
Maharashtra New Crop Insurance Scheme Announced

Maharashtra New Crop Insurance Scheme Announced : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी नवीन सुटसुटीत पीक विमा योजना आणण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. याआधीच्या एक रुपयाच्या पीक विमा योजनेतील गैरप्रकार लक्षात आल्यानंतर सरकारने नव्या स्वरूपातील अधिक प्रभावी योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळेल, असेही स्पष्ट केले आहे.

राज्यातील शेती क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर पाच हजार कोटी रुपयांची नवीन योजना आणण्याचा विचार सुरू आहे. ही योजना पोकराच्या धर्तीवर राबवली जाणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध सुविधा देण्याचा विचार करण्यात आला आहे.

🔴 हेही वाचा 👉 ‘जिवंत सातबारा’ मोहीम, वारसांना जमिनीच्या हक्काची त्वरित नोंदणी मिळणार.

मिलेट बोर्डची स्थापना

तृणधान्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळावे यासाठी महाराष्ट्रात मिलेट बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे कार्यालय पुण्यात हलविण्यात येणार नसून ते अकोल्यातच राहील, असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ लवकरच

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील रखडलेली रक्कम लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असून, चार ते आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होईल, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा संरक्षण मिळावे आणि कृषी क्षेत्रात आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे, यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.

🔴 हेही वाचा 👉 रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर नियमांमध्ये 27 मार्चपासून मोठा बदल, जाणून घ्या नवीन नियम.

Share This Article