Mahila Samman Savings Certificate Yojana Details : महिलांना आणि मुलींना बचतीची सवय लागावी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Samman Savings Certificate) सुरू केली आहे. टपाल कार्यालये आणि विविध शेड्युल्ड बँकांच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेअंतर्गत महिलांना ७.५० टक्के वार्षिक व्याजदराने गुंतवणुकीवर लाभ मिळतो. गुंतवणुकीची किमान मर्यादा १,००० रुपये असून या योजनेत जास्तीत जास्त २ लाख रुपये गुंतवता येतात.
पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
महिला आणि मुलींना या योजनेत सहभागी होता येईल. यासाठी कोणतीही विशिष्ट वयोमर्यादा नाही. अर्ज करण्यासाठी महिला जवळच्या टपाल कार्यालयात किंवा शेड्युल्ड बँकेत जाऊन अर्ज करू शकतात.
योजनेची मुदत आणि पैसे काढण्याचे नियम
ही योजना २ वर्षांसाठी वैध आहे. गुंतवलेले पैसे दोन वर्षांपूर्वी काढता येणार नाहीत. मात्र, गुंतवणुकीनंतर १ वर्ष पूर्ण झाल्यावर खात्यातील ४०% रक्कम काढता येऊ शकते.
योजना मुदतीपूर्वी बंद करण्याचे निकष
जर कोणत्याही कारणाने ही योजना मुदतीपूर्वी बंद करायची असेल, तर ६ महिन्यानंतर ती बंद करता येईल. मात्र, अशावेळी व्याजदर ७.५०% ऐवजी ५.५०% लागू होईल.
मृत्यूनंतर वारसांना रक्कम मिळण्याची प्रक्रिया
गुंतवणूकदार महिलेचा मृत्यू झाल्यास तिच्या अधिकृत वारसाला गुंतवणूक आणि त्यावरील व्याज दिले जाते. अल्पवयीन मुलीच्या नावाने गुंतवणूक केल्यास तिच्या पालकांचा मृत्यू झाल्यास आवश्यक कागदपत्रे सादर करून योजना बंद करता येऊ शकते.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत ३१ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करता येईल.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना महिला आणि मुलींसाठी आर्थिक सुरक्षिततेचा एक उत्तम पर्याय आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे महिलांना बचतीची चांगली संधी मिळेल आणि भविष्यातील गरजा भागवण्यासाठी आर्थिक स्थैर्य प्राप्त करता येईल.
🔴 हेही वाचा 👉 फक्त 436 रुपयांत 2 लाख रुपयांचे विमा कव्हर, जाणून घ्या संपूर्ण माहिती.