Majhi Ladki Bahin Yojana 8th 9th Installment Update : महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याआधी जाहीर केले होते की १२ मार्चपर्यंत आठवा आणि नववा हप्ता एकत्रितपणे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. मात्र, १४ मार्च उजाडला तरी अनेक महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
काही महिलांच्या खात्यात पैसे जमा, तर अनेकांना प्रतीक्षा
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने काही महिलांच्या खात्यात आठवा हप्ता जमा केला असून नववा हप्ता १३ मार्चपासून टप्प्याटप्प्याने खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनही काही महिलांना याचा लाभ मिळालेला नाही.
🔴 हेही वाचा 👉 मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरूवात, फेब्रुवारी-मार्च महिन्याचे पैसे न मिळण्यामागचे कारण काय?.
योजना बंद होणार का? सरकारचे मोठे वक्तव्य
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळण्यास विलंब होत असल्याने ही योजना बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की योजना बंद केली जाणार नाही. गरज भासल्यास पुढील आर्थिक वर्षासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात येईल.
🔴 हेही वाचा 👉 अर्थसंकल्पात 2100 रुपयांचा उल्लेख नाही, सरकारच मत काय?.
योजनेसाठी पात्रता:
✔️ लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
✔️ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असावे.
✔️ लाभार्थी महिलेचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही महिलांना पैसे मिळाले असले तरी अनेक महिलांना अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. ही योजना बंद होणार नसून सरकारने तिच्या सातत्याची हमी दिली आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींची संख्या वाढली! या महिलांना 500 रुपयांची वाढ, अदिती तटकरेंचे विधानसभेत स्पष्टीकरण.