Free Electricity Maharashtra: आता या गावातील नागरिकांना भरावे लागणार नाही वीज बिल

1 Min Read
Nagarwadi Solar Village Electricity Free Maharashtra (Getty Images)

Nagarwadi Solar Village Electricity Free : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील नागरवाडी गावाने महाराष्ट्रातील पहिले 100% सौरग्राम होण्याचा मान मिळवला आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या (PM Surya Ghar Yojana) मदतीने या गावाने छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून विजेचे स्वतंत्र उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे गावातील वीज बिल शून्यावर येणार आहे.

संत गाडगे महाराज संस्थान नागरवाडी या गावाचा स्वतंत्र दर्जा असून, येथे आश्रमशाळा, वसतिगृह आणि शिक्षकांसाठी निवासी व्यवस्था आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शिक्षक सदनिकेच्या छतावर 1 किलोवॅट क्षमतेचे सौर प्रकल्प बसविण्यात आले. तसेच संस्थेसाठी 7.5 किलोवॅट क्षमतेचा स्वतंत्र सौर प्रकल्प बसवण्यात आला. त्यामुळे संपूर्ण गावात एकूण 17.5 किलोवॅटची सौर ऊर्जा निर्मिती सुरू झाली आहे, ज्यामुळे दरमहा सरासरी 2000 युनिट वीज निर्मिती होईल आणि तेवढीच बचतही होणार आहे.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन गावे 100% सौरग्राम करण्याचे नियोजन सुरु केले आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील गावांना स्वयंपूर्ण ऊर्जा निर्मितीच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपयांची पेन्शन, महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.

Share This Article