Namo Shetkari Hafta: सहाव्या हफ्त्यासाठी शासन निर्णय जारी, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार अनुदान

2 Min Read
Namo Shetkari Hafta Sixth Installment Gr Issued (फोटो : Freepik)

Namo Shetkari Hafta Sixth Installment Gr Issued : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची (Namo Shetkari Yojana 6th Installment) प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. शासनाने सहाव्या हफ्त्याच्या वितरणासंदर्भात निर्णय घेतला असून, त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.

पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न अनेक शेतकरी विचारत होते. मागील वेळी केवळ पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला होता, त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या अनुदानाची प्रतीक्षा वाढली होती. मात्र, अखेर सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जारी करत सहाव्या हप्त्यासह प्रलंबित दायित्वांचे वितरण करण्यास मंजुरी दिली आहे.  

शासन निर्णयानुसार, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीतील सहाव्या हप्त्यासाठी तसेच मागील हप्त्यांचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी १६४२.१८ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय, यापूर्वीच्या हप्त्यांसाठी शिल्लक असलेल्या ६५३.५० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीसह हा हप्ता लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 ‘लाडकी बहीण’ योजनेच्या सावलीत महिलांसाठी तरतुदीत घट; विधानसभेत जेंडर बजेट सादर.

राज्यातील लाखो शेतकरी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळवतात. त्यामुळे सहाव्या हप्त्याच्या निधीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

🔴 हेही वाचा 👉 हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत? या शेतकऱ्यांना बसू शकतो फटका.

Share This Article