Varas Nond : महाराष्ट्रात वारसा नोंदणीसाठी विशेष मोहीम सुरू
Online Varas Nondani Maharashtra Land Records Update : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या हक्काच्या जमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. महसूल विभागाने ही प्रक्रिया जलद आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी नियोजन आखले आहे.
वारसा नोंदणी प्रक्रिया कशी असेल?
✅ गावातील तलाठी मृत खातेदारांची यादी तयार करतील.
✅ वारसांनी तलाठ्याकडे खालील कागदपत्रे सादर करावी लागतील:
– अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र
– वारसांचे जन्मतारीख दर्शवणारे दस्तऐवज
– आधार कार्डाची सत्यप्रत
– स्वयंघोषणापत्र किंवा शपथपत्र
– अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि मोबाइल क्रमांक
✅ तलाठ्याकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर मंडळाधिकाऱ्यांकडून वारस नोंदणी प्रस्ताव मंजूर केला जाईल.
✅ सातबारा उताऱ्यात आवश्यक दुरुस्ती करून वारसांची अधिकृत नोंद केली जाईल.
✅ तहसीलदारांना या मोहिमेचे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली जाईल.
✅ ई-हक्क प्रणालीद्वारे (E-Hakka System) अर्ज स्वीकारले जातील.
🔴 हेही वाचा 👉 ‘लाडकी बहिण योजना’ महाराष्ट्र सरकारसाठी मोठ आर्थिक संकट, मंत्री म्हणाले – मागण्या कमी करा.
बुलढाणा जिल्ह्यातील प्रायोगिक प्रकल्प यशस्वी
🔹 बुलढाणा जिल्ह्यातील यशस्वी चाचणीनंतर ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार आहे.
🔹 राज्यभरातील सातबारा उतारे अद्ययावत करण्यासाठी 100 दिवसांचा विशेष कृती आराखडा तयार केला आहे.
🔹 महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी सुरू केली आहे.
🔴 हेही वाचा 👉 बचत गुंतवणुकीसाठी सरकारची 100% हमी असलेली योजना.
लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी
महाराष्ट्रभर ही प्रक्रिया लागू झाल्यानंतर खऱ्या कायदेशीर वारसांना त्यांच्या जमिनीवर कायदेशीर अधिकार मिळणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 जुना मोबाइल नंबर बंद झाला? अशा प्रकारे आधारशी लिंक करा नवीन नंबर.