PM Awas Yojana Ineligible Beneficiaries Housing Survey Extended : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभ घेण्यास सरकारी कर्मचारी, तीनचाकी वाहन आणि चारचाकी वाहनधारक अपात्र ठरणार आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षणाची कालमर्यादा एका महिन्याने वाढवण्यात आली असून, आता पात्र कुटुंबांची नोंदणी 30 एप्रिलपर्यंत करता येणार आहे. यापूर्वी ही प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.
कोण होणार अपात्र?
शासनाच्या नियमानुसार खालील गटातील कुटुंबे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अपात्र ठरतील:
- सरकारी नोकरीत असलेले कुटुंब
- तीनचाकी किंवा चारचाकी वाहनधारक
- यांत्रिक शेतीसाठी वापरण्यात येणारे वाहनधारक
- नोंदणीकृत बिगर-शेती व्यवसाय असलेले कुटुंब
- वार्षिक 15,000 रुपयांपेक्षा अधिक मासिक उत्पन्न असलेले कुटुंब
- आयकर भरत असलेले कुटुंब
- 2.5 एकरपेक्षा जास्त सिंचित किंवा 5 एकरपेक्षा जास्त कोरडवाहू शेती असलेले कुटुंब
या गटातील कुटुंबांना मिळणार लाभ
- दोनचाकी वाहन असलेले कुटुंब
- 50,000 रुपयांपेक्षा कमी कर्ज मर्यादा असलेले किसान क्रेडिट कार्डधारक
- 15,000 रुपयांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेले कुटुंब
- आश्रयविहीन, बेघर, मजूर आणि आदिवासी समूहातील कुटुंबे
🔴 हेही वाचा 👉 बंद पडली लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पडताळणीची प्रक्रिया, अडीच कोटी महिलांसाठी महत्त्वाची माहिती.